अनन्याच्या लग्झरी लाईफस्टाईलबद्दल जाणून घेऊयात...

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गहराईंया या चित्रपटातील अभिनयामुळे अनन्या पांडे ही सध्या चर्चेत आहे.

गेहराईंया या अनन्याचा चौथा चित्रपट आहे. स्टूडंट ऑफ द इयर या चित्रपटामधून अनन्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

खाली पीली आणि पति पत्नी और वो या चित्रपटांमधील आनन्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनन्याच्या लग्झरी लाईफस्टाईलबद्दल जाणून घेऊयात...

अनन्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे.

बीएमडब्ल्यू 7 सीरिज सिडान, रेंज रोव्हर आणि मर्सिडीज बेंज ई क्लास या गाड्या अनन्याकडे आहेत.

मुंबईमधील वांद्रे येथे अनन्या तिच्या कुटुंबासोबत राहते.

लवकरच अनन्याचे लायगर आणि खो गए हम कहा हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.