जांभूळ खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो तसेच पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
जांभूळ मधुमेहावर अतिशय गुणकारी आहे. जांभळामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे.
पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरतं.
जर अपचन आणि पोटदुखीचा त्रास असेल तर जांभळाचा रस प्या. त्यामुळे अपचन आणि पोटदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.
जांभूळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. जांभूळ फळामध्ये लोहाचं प्रमाण खूप असते.
जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावरती लेप केल्याने चेहऱ्यावरती आलेल्या तारुण्यटिपिका म्हणजेच मुरुमे बरे होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.