निरोगी राहण्यासाठी फळे आणि भाज्यांसोबत बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या ड्रायफ्रुट्सचे सेवन करणे खूप गरजेचं असते. कारण या ड्रायफ्रुट्समुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अक्रोडमध्ये अनेक पोषण तत्त्वांचा समावेश असतो. ज्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम यांचा समावेश असतो. वजन कमी करण्यासाठी देखील अक्रोड खाणे फायदेशीर ठरु शकते. पण अक्रोड खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या डाएटमध्ये अक्रोडाचा समावेश केला जाऊ शकतो. कारण त्यामध्ये हेल्ही फॅट्स असतात. तसेच यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगल्या प्रमाणात आढळते. अक्रोडामुळे पाचन क्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी काही अक्रोड तुम्ही भिजवून ठेवा आणि नंतर ते खा. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.