वर्ल्ड स्लीप सोसायटी ही संस्था वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लोकांना बर्याच आजारांना सामोरं जावं लागतं. अगदी नकळत या अपुऱ्या झोपेचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. हे रोखण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा करण्यास सुरुवात केली. आज जगातील 88 हून अधिक देशांमध्ये 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा केला जातो. पहिल्यांदा 2008 साली हा दिवस साजरा केला गेला. निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे, हे लोकांपर्यंत पोहोचावं, सर्वांना झोपेचं महत्त्व कळावं यासाठीचा हा एक प्रयत्न! 'क्वालिटी स्लीप, साउंड माईंड, हॅप्पी वर्ल्ड' ही या वर्षीच्या जागतिक निद्रा दिनाची थीम आहे. यामधून मन आणि शरीरावर झोपेचा काय परिणाम होतो हे अधोरेखित करण्यात आले आहे.