हृदय विकाराचा आजार असलेल्यांना हार्ट अॅटकचा अधिक धोका असतो. हार्ट अॅटक येण्याआधी शरीरात काही बदल दिसून येतात. हार्ट अॅटक येण्याआधी छातीत दुखणे आणि अस्वस्थ वाटू लागते. अशा स्थितीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या स्थितीत तुमच्या छातीच्या मध्यभागी अथवा डाव्या हाताच्या बाजूला अधिक जडपणा जाणवू शकतो. काही लोकांना हार्ट अॅटक येण्याआधी अशक्तपणा आणि चक्कर येणे आदी लक्षणे दिसू शकतात. त्याशिवाय जबडा, पाठ आणि मानेत दुखणे, अस्वस्थ जाणवणे आदी लक्षणेही जाणवू शकतात. हार्ट अॅटक येण्याआधी श्वास घेण्यासही त्रास जाणवू शकतो. यामध्ये रुग्णाला धाप लागणे आदी लक्षणेही जाणवू शकतात. कोणत्याही शारिरीक मेहनतीशिवाय थकवा जाणवणे, उलटी आणि मळमळ जाणवणे आदी लक्षणे जाणवू शकतात हार्ट अॅटकची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या स्थितीत रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असते. जर, तुमच्या घरात एखादा हृदय विकाराने आजारी असल्यास त्यांना सकस आहार द्यावा. तणावापासून त्यांना दूर ठेवावे. यामुळे हार्ट अॅटकचा धोका कमी असतो.