रिपोर्टनुसार, समंथाला 2013 मध्ये एका टेस्टमध्ये कळाले की तिला मधुमेह झाला आहे. समंथा आता बरी झाली आहे पण तिनं या आजारमुळे त्यावेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला. समंथानं त्यावेळी 'मणिरत्नम' सारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता. समंथा सहा महिने अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. 2012 मध्ये समंथा पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन या स्किन संबंधित आजाराचा सामना करत होती. सूर्यप्रकाशात गेल्यानंतर त्रास होणे तसेच त्वचेची जळजळ होणे इत्यादी या आजाराची लक्षणं आहेत. एका मुलाखतीमध्ये समंथानं सांगितलं होतं की तिची इम्यूनिटी सिस्टम ही नाजूक आहे. त्यामुळे तिला इंफेक्शनचा त्रास होऊ शकतो. समंथा तिच्या डाएटकडे आणि वर्क आऊट विशेष लक्ष देते. रिपोर्टनुसार समंथा फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश डाएटमध्ये करते.