'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याची चर्चा होत आहे.



काही दिवसांपूर्वी या गाण्यानं गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला तर आता या चित्रपटाने ऑस्कर (Oscar 2023) हा पुरस्कार जिंकला आहे.



नाटू नाटू गाण्याचे संगीतकार कोण आहेत? हे गाणं कोणी लिहिलं? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. जाणून घेऊयात नाटू नाटू या गाण्याबाबत



चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे. तर एम एम किरावाणी यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.



नाटू नाटू या गाण्यातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



प्रेम रक्षित यानं या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. या गाण्यातील सिग्नेचर स्टेप ही आयकॉनिक ठरली.



नाटू-नाटू या गाण्याचे शूटिंग युक्रेनमध्ये झाले आहे.



आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.



चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.



आरआरआर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.