जान्हवीच्या लूक्स, स्टाईल आणि अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतेच तिच्या विंटेज लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. जान्हवीनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'डोक्यात फुलं आणि कोळशापासून तयार केलेले काजळ हे मिस करत आहे. आता स्वत:ला सनस्क्रिन लावून धूळीपासून वाचवत आहे. ' जान्हवीनं फ्लोरल प्रिंट साडी, केसात गजरा आणि गळ्यात ऑक्साइड ज्वेलरी अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. जान्हवीच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. जान्हवीच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक केलं असून अनेकांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. जान्हवीच्या या लूकचं अनेकांनी कौतुक केलं आहे. जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते. जान्हवीच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. गुडलक जेरी या चित्रपटामधील जान्हवीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.