आरआरआर चित्रपटातील अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी ऑल ब्लॅक लूक केला.तर दिग्दर्शक एसएस राजामौली हे जांभळा कुर्ता आणि धोती अशा ट्रेडिशन लूकमध्ये दिसले.
राम चरणची पत्नी उपासनानं देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.
आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याचे गायक काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला.
एम एम किरावाणी यांनी देखील ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
दीपिकानं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला. तसेच तिनं एक खास नेकपिस देखील परिधान केला होता.
दीपिकानं तिच्या या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
दीपिकानं शेअर केलेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन तिला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ज्युनियर एनटीआरनं त्याच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
ब्लॅक जॅकेट, ब्लॅक पँट आणि ब्लॅक शूज असा ऑल ब्लॅक लूक ज्युनियर एनटीआरनं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी केला होता.
यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.