बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. नीतू या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'जुग जुग जियो' (Jug jugg Jeeyo) या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. नीतू कपूर यांनी मर्सिडीज-मेबॅक GLS ही (Mercedes-Maybach GLS ) लग्झरी कार घेतली आहे. मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार MH या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नीतू कपूर आणि त्यांच्या नव्या कारचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. फोटोमध्ये नीतू कपूर या ब्लू अँड ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहेत. नीतू कपूर यांनी मर्सिडीज-मेबॅक GLS ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीमध्ये अनेक फिचर्स आहेत. नीतू कपूर यांनी खरेदी केलेल्या मर्सिडीज-मेबॅक GLS या गाडीची किंमत 2.92 कोटी एवढी आहे. नीतू कपूर यांनी घेतलेल्या मर्सिडीज-मेबॅक GLS या गाडीमध्ये कम्फर्ट आणि टेक्नोलॉजी यांचे कॉम्बिनेशन आहे नीतू कपूर यांनी खरेदी केलेली ही गाडी अर्जुन कपूर, आयुष्मान खुराणा आणि रणवीर सिंह या सेलिब्रिटींकडे देखील ही गाडी आहे. लवकरच लेटर टू मिस्टर खन्ना या चित्रपटामधून नीतू या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.