बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. नुकतेच फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सध्या फरहान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मुंबईमध्ये वांद्रे या परिसरात फरहानचा बंगला आहे. हा बंगला शाहरूखच्या मन्नत बंगल्याच्या जवळ आहे. रिपोर्टनुसार हा बंगला फरहाननं 2009 साली खरेदी केला. 10 हजार स्क्वेअर फीट एरियामध्ये असणाऱ्या या बंगल्याची किंमत 35 कोटी आहे. फरहानचा खंडाळ्यामध्ये फरहानचं 'सुकून' नावाचं फार्महाऊस देखील आहे. या फार्म हाऊसमध्ये शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. फरहानकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. फरहानकडे पोर्श कंपनीची केमॅन ही गाडी आहे. तसेच फरहानकडे लँड रोव्हर, मर्सिडीज बेंज एमएल 350 सीडीआय आणि मर्सिडीज 350 डी या गाड्या देखील आहेत.