अलाया फर्निचरवाला तिच्या स्टायलिश लूकसाठी प्रसिद्ध आहे. अलाया तिचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करते. अलायाने आताही ब्लॅक ड्रेसमधील तिचे फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये अलायाच्या वेगवेगळ्या अदा पाहायला मिळतात. ब्लॅक ड्रेसमध्ये अलाया बोल्ड आणि ब्युटिफूल दिसते. अलायाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. अलाया ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' मधून अलायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अलाया नुकतंच फ्रेडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. फ्रेडी या चित्रपटातील अलायाच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केलं.