लसूण बारिक करून मुरूमांवर लावावेत. याने लगेच परिणाम होतो. लसूण खाल्ल्याने मुरूमांचे डाग नाहीसे होतात. पचनात काही अडचण आल्यास मुरूम येण्याची शक्यता असते. इडली , डोसा , दही यांचा आहारात समावेश करावा. सकाळी उपाशीपोटी गरम पाणी आणि लिंबू घ्यावे. रात्री झोपताना चेहऱ्यावर लिंबू लावून झोपावे. कडूनिंबाची पाने बारिक करून त्यात हळद घालून ते मुरूमांवर लावावे. कडूनिंबाची पाने पाण्यात घालून त्याने अंघोळ करावी. नेहमी बाहेरून आल्यानंतर चेहरा धुवावा. फळे , पालेभाज्या , काजू , बदाम , पपई यांचा आहारात समावेश करावा.