मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
केतकी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते.
आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केतकीने तिच्या स्टाइलने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मकरसंक्रांतीनिमित्त केतकी चितळेने एक खास फेसबुक पोस्ट केली आहे.
केतकी चितळेने फेसबुकवर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत लिहिलं आहे,जे वर्षानुवर्षे मी लिहित आले आहे तेच आज पुन्हा लिहित आहे. तिळगुळ खा आणि खोटे गोड गोड न बोलता कडू सत्य बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
केतकीची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
केतकीच्या फेसबुक पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती.
गेल्या काही वर्षांपासून केतकीला अपस्मार हा आजार आहे.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी नेहमीच चर्चेत राहिली आहे.