सिने-अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून कियारा आडवाणीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

सिद्धार्थने 2012 साली प्रदर्शित झालेल्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

पहिल्याच सिनेमासाठी सिद्धार्थला सिनेसृष्टीतील मानाच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

सिद्धार्थने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे.

2010 साली सिद्धार्थने करण जौहरच्या 'माय नेम इज खान' या सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

सिद्धार्थने हसी तो फसी, एक व्हिलन, कपूर अॅन्ड सन्स, इत्तेफाक, मरजावां, शेरशाह अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.

सिद्धार्थ आज एक यशस्वी अभिनेता असला तरी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

सिद्धार्थचा 'मिशन मजनू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिद्धार्थ सध्या त्याच्या आगामी 'योद्धा' या सिनेमाचं शूटिंग करत आहे.