नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.

यात सेलिब्रिटीही कुठे मागे नाहीत. नुकतंच अभिनेत्री राधा सागरने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री राधा सागरने यावेळी काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने परिधान केले होते.

काळ्या रंगाच्या साडीत राधा अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत होती.

अभिनेत्री राधा सागर अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमांतून घराघरांत पोहोचली आहे.

'आई कुठे काय करते' मधील अंकिताची भूमिका, तसेच 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील अभिलाषाची भूमिका विशेष लक्षणीय ठरली.

राधाने बॉलिवूड चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' चित्रपटात ती दिसली होती.