हिंदी सिनेसृष्टीत धुमाकूळ घातल्यानंतर रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीतदेखील चांगलाच धमाका केला आहे.

रितेश आणि जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.

कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा 'वेड' ठरला आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलियाचा मोठा चाहतावर्ग आहे.

'वेड' प्रदर्शित होऊन आता पंधरा दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर सिनेमाची जादू कायम आहे.

'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

'वेड' हा सिनेमा दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत वेड दुसऱ्या स्थानावर आहे.

'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 44.92 कोटींची कमाई केली आहे.

वेड सिनेमा लवकरच 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.