कतरिना आणि विकीने लग्नानंतरची पहिली होळी कुटुंबियांसोबत साजरी केली आहे. त्यांचा कलरफुल फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विकी आणि कतरिनाने शेअर केलेल्या फोटोत विकीचा भाऊ अभिनेता सनी कौशल, आई वीणा कौशल आणि वडील शाम कौशलदेखील दिसत आहेत. कतरिना आणि विकीने शेअर केलेल्या फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत. लवकरच त्यांचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कतरिना आणि विकी डिसेंबर 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. सध्या दोघेही त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. राजस्थानमधील बरवाडा किल्ल्यावर शाही थाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता.