अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लग्न झाल्यापासून शुटिंगच्या निमित्ताने एकमेकांपासून वेगळे आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने दोघांमधील हे अंतर संपुष्टात येईल असे चाहत्यांना वाट आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने विकी आणि कतरिना एकत्र यावेत असे चाहत्यांना वाटत असले तरी याच्या उलटंच घडलं आहे. टायगर 3 च्या शूटिंगमुळे कतरिनाला तिचा व्हॅलेंटाईन विकीपासून दूर एकट्याने साजरा करावा लागणार आहे. लग्नानंतर या दोघांनी खूप कमी वेळ एकत्र घालवला आहे. कधी विकी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो तर कधी कतरिना तिच्या शूटमध्ये. यावेळी मिसेस कौशल लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन पती विकी कौशलसोबत नाही तर मित्र सलमान खानसोबत साजरा करणार आहे. कतरिना कैफ सलमान खानसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे. त्यामुळे टायगर 3 च्या शुटिंगसाठी हे दोघे जण दिल्लीला गेले आहेत.