अरबाज खान मलाईकाला घटस्फोट दिल्यानंतर जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहे. अरबाज आणि जॉर्जियाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चार वर्षांपूर्वी अरबाज व मलायका अरोरा विभक्त झाले. त्यानंतर तो जॉर्जियाला डेट करू लागला. जॉर्जिया एक इटॅलियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जॉर्जियाने ‘कॅरोलीन कामक्षी’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. जॉर्जिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर जॉर्जिया बरेच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. जॉर्जियाने नुकतंच पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.