बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) तिच्या खास मित्राला अर्थात सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

कतरिना कैफने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत.

सलमानचा फोटो शेअर करत कतरिनाने लिहिले आहे,सलमान खान तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यातला प्रेमळ स्वभाव आणि चेहऱ्यावरची चमक कायम अशीच राहुदे.

कतरिनाचे लग्न ठरल्यापासूनच चाहत्यांमध्ये कतरिना आणि सलमानच्या मैत्रीची चर्चा होती.

त्यामुळे आज सलमानच्या वाढदिवशी चाहते कतरिनाच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत होते.

कतरिना दरवर्षी सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते. त्यामुळेच लग्नानंतरदेखील तिने सलमानला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला सलमान खानची हजेरी नव्हती.