बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन सध्या त्यांच्या आगामी 'शेहजादा' सिनेमामुळे चर्चेत आहेत.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन त्यांच्या आगामी 'शेहजादा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी ताजमहालात गेले आहेत.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर शेहजादा, ताज आणि मुमताज असं म्हणत एक फोटो शेअर केला आहे.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननचा 'शेहजादा' हा सिनेमा येत्या 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'शेहजादा' हा सिनेमा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांच्या 'वैकुंठापुरमुलू' या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे.

अनीस बज्मीने 'शेहजादा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

कार्तिकने ताजमहालासमोर क्रितीसोबत रोमॅंटिक पोझ देत फोटो काढला आहे.

'शेहजादा'नंतर कार्तिक-कियारा 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमात झळकणार आहेत.

कार्तिक-कियारा लवकरच 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.