कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ येत्या 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगढ महालात कियारा-सिडचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. कियाराच्या हातावर आज सिद्धार्थच्या प्रेमाचा रंग चढणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ महालात आज कियाराच्या मेहंदी समारंभाचा कार्यक्रम रंगणार आहे. सेलिब्रिटी मेहंदी डिझायनर वीणा नागदा कियाराच्या हातावर मेहंदी काढणार आहे. सिद्धार्थ - कियाराच्या लग्नातही 'नो फोन' पॉलिसी असणार आहे. कियारा-सिद्धार्थच्या मेहंदी सोहळ्यासाठी खास सेट डिझाइन करण्यात येणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी राजस्थानातील जैसलमेरमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या मेहेंदी कार्यक्रमांसाठी दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.