टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बॅनर्जी पुन्हा एकदा सेटवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. तिला 'बडे अच्छे लगते हैं 2' मध्ये राम कपूर आणि प्रियाची मुलगी पीहूची भूमिका ऑफर करण्यात आली आहे. जवळपास वर्षभरानंतर ती कॅमेऱ्याचा सामना करणार आहे. यापूर्वी ती 'कुमकुम भाग्य'मध्ये दिसली होती, पण नंतर ती मॅटर्निटी ब्रेकवर गेली. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिने मुलाला जन्म दिला. आता ती टीव्हीवर पुनरागमन करत आहे. पूजा बॅनर्जीने वर्षभराच्या विश्रांतीनंतर कम बॅक केल्यानंतर आनंदी वाटत आहे असे म्हटले आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अटाऊंटवर बाळासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे.