भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक चित्रपट आणि गाण्यांमध्ये फारशी दिसत नसली तरी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. नेहाचा चाहता वर्ग मोठा आहे. अलीकडेच नेहाचा एक नवीन रील व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा बेडवर आकर्षक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला 24 तासांत 1 लाख 16 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेहा मलिकने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका फोटोशूटमधला आहे. व्हिडिओमध्ये नेहा चकचकीत पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. नेहाच्या मेकअपही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नेहाने खेसारी लाल सारख्या भोजपुरी सिनेसृष्टीतील बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.