कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली आहे.



कार्तिक हा सध्या त्याच्या भूल भुलैय्या-2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे.



IIFA 2022 मध्ये कार्तिक हा सहभाग घेणार होता.



आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कार्तिकनं कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.



कार्तिकनं त्याचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सगळं एवढं पॉझिटिव्ह सुरू होतं, त्यामुळे कोरोनाला पण राहावलं नाही. '



कार्तिकला याआधी देखील कोरोनाची लागण झाली होती.



भूल भुलैय्या-2 च्या शूटिंग दरम्यान कार्तिकला कोरोनाची लागण झाली होती. पण नंतर कार्तिकचा रिपोर्ट निगेटिव्ह आला



लवकर कार्तिकचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



कार्तिकच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.



कार्तिकचा भूल भुलैय्या-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.