टीम इंडियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे.



या मालिकेतील पहिला टी-20 सामना 9 जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.



या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे



या मालिकेत केएल राहुलकडं भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.



आयसीसी टी-20 क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारतानं मागील सलग 12 सामन्यात विजय मिळवला आहे



भारतानं अफगाणिस्तान (1), नामिबिया (1), स्कॉटलंड (1), न्यूझीलंड (3), वेस्ट इंडिज (3) आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यात विजय मिळवला आहे.



भारतीय संघानं पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर सलग ट-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत तो रोमानिया आणि अफगाणिस्तानला मागं टाकेल.



भारताविरुद्ध टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड राहिलंय. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानंही कधीही टी-20 मालिका गमावली नाही.