कांतारा चित्रपटात अभिनेता ऋषभ शेट्टीनं (Rishab Shetty) प्रमुख भूमिका साकारली.



ऋषभनेच कांतारा या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलं.



आता कांताराच्या यशानंतर ऋषभ लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. यावर आता ऋषभनं प्रतिक्रिया दिली आहे.



एका नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय देत राजकारणात प्रवेश न करण्याबाबत ऋषभनं सांगितलं.



ऋषभ शेट्टी रिप्लाय दिला की, 'मी राजकारणात प्रवेश करणार नाही. ही खोटी बातमी आहे. काही लोकांना वाटतं की मी एका विशिष्ट पक्षाचा समर्थक आहे. पण मी कधीही राजकारणात जाणार नाही.'



एका चाहत्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं की ऋषभनं राजकारणात यावे आणि त्याला लोकांनी पाठिंबा द्यावा.



ऋषभ शेट्टीनं चाहत्याच्या या पोस्टवर म्हणाला की, मला राजकारणातील समर्थनाची गरज नाही. कृपया माझ्या चित्रपटांना समर्थन द्या. हे माझ्यासाठी पुरेसे आहे.



ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



ऋषभच्या कांतारा-2 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत



कांतारा या चित्रपटामुळे ऋषभ शेट्टीला विशेष लोकप्रियता मिळाली.