सुप्रसिद्ध लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी भारतातच नाही तर जगभरात विशेष ओळख निर्माण केली आहे.



जावेद अख्तर हे विविध विषयांवर आपली मतं मांडत असतात.



जावेद अख्तर यांनी लिहिलेले डायलॉग्स, गाणी ही प्रेक्षकांची मनं जिंकतात.



लेखनक्षेत्रातील योगदानाबद्दल जावेद अख्तर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.



आता लवकरच त्यांना लंडन SOAS विद्यापीठाकडून (SOAS University of London) डॉक्टरेट पदवी देण्यात येणार आहे.



लंडनच्या SOAS विद्यापीठानेच्या निवेदनानुसार, जावेद अख्तर यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे



कवी, गीतकार, पटकथा लेखक या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (DLit) म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.



लंडनच्या SOAS विद्यापीठाच्या एका समारंभामध्ये जावेद अख्तर यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (Doctor of Literature) म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. हा समारंभ सप्टेंबरमध्ये 5, 6 किंवा 7 तारखेला होऊ शकतो



अंदाज, जंजीर, डॉन (1978), दिल चाहता है, दीवार,शोले, सागर (1985),सिलसिला, सीता और गीता या चित्रपटाच्या पटकथा जावेद अख्तर यांनी लिहिल्या आहेत.



जावेद अख्तर यांना पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे.