बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगणचा आज 54 वा वाढदिवस आहे. अजयनं हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे. अजय हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सिंघम, दृष्यम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणारा अजय हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. अजय देवगणची एकूण संपत्ती 427 कोटी आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच अजय हा ब्रँड एंडोमेंट देखील करतो. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अजय हा एका चित्रपटासाठी 30 ते 50 कोटी रुपये मानधन घेतो. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या फूल और कांटे या चित्रपटाच्या माध्यामातून अजयनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजयनं दिलवाले,धनवान, विजयपथ, प्यार तो होना ही था या चित्रपटांमध्ये देखील काम केलं. अजय देवगणने चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. आजयचा चाहता वर्ग मोठा आहे.