तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत. सध्या त्यांच्या या फोटोंच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या दिसत आहेत. इंडियन असो वा वेस्टर्न, नुसरत जहाँ यांच्या अदांची बात काही औरच... नुसरत जहाँ यांनी साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये नुसरत जहाँ यांनी लाल बनारसी साडी नेसली आहे. नुसरत जहाँ यांनी गोल्डन बॉर्डर असणारी लाल रंगाची साडी नेसली आहे. लाल बनारसी साडीसोबत नुसरत यांनी केलेला श्रुंगार त्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत करतोय. काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांनी वेस्टर्न लूकमधील काही फोटो शेअर केले होते. नुसरत जहाँ यांच्या फोटोंवर नेहमीच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.