बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. इंडस्ट्रीत आपल्या अभिनयासाठी आणि प्रत्येक मुद्द्यावर बेधडक मत व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाचा आज 35वा वाढदिवस आहे. कंगनाने अतिशय कमी वयातच इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कंगनाला चित्रपटांमध्ये काम मिळाले आणि ती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकली. कंगनाला अनेकदा यश मिळाले नाही, पण तिने कधीही हार मानली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना ब्रँड एंडोर्समेंटमधून सर्वाधिक कमाई करते. ती एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी 3-3.5 कोटी रुपये आकारते. आता ती अभिनेत्रीसोबतच एक फिल्म प्रोड्यूसरही बनली आहे. रिपोर्टनुसार ती एका वर्षात सुमारे 15 कोटी रुपये कमवते.