बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या 'तेजस' (Tejas) या सिनेमामुळे चर्चेत आहे.

आज वायुसेना स्थापना दिनानिमित्त या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आऊट करण्यात आला आहे.

'तेजस' या सिनेमाचा ट्रेलर कंगनाने शेअर केला आहे.

'तेजस' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.

या बहुप्रतिक्षित ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

'तेजस' सिनेमाच्या निर्मात्यांनी आज वायुसेना स्थापना दिनानिमित्त ट्रेलर आऊट केला आहे.

ट्रेलरमध्ये कंगना रनौत वैमानिक तेजस गिल यांच्या भूमिकेत दिसत आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच भारत को छेडेंगे तो छोडेंगे नहीं

हा दमदार डायलॉग बोलताना अभिनेत्री दिसत आहे.

एकंदरीतच ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच खळबळ उडवून दिली आहे.