कंगना रनौत ही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाते. कंगना वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कंगनानं बॉलिवूड स्टार्सबाबत वक्तव्य केलं आहे. तिनं दाक्षिणात्य अभिनेत्यांचं कौतुक देखील केलं. मुलाखतीमध्ये कंगनानं सांगितलं की, 'दाक्षिणात्य अभिनेत्यांबरोबर प्रेक्षक लवकर कनेक्ट होतात.' टस्टार किड्स हे कडलेल्या अंड्यासारखे दिसतात. त्यामुळे लोक त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकत नाहीत. मला त्यांना ट्रोल करायचं नाही. ' , असं कंगना म्हणाली. 'पुष्पाः द राइज' चित्रपटामधील दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं कंगनानं कौतुक केलं. ती म्हणाली की, बॉलिवूडमधील कोणताच अभिनेता असं काम करु शकणार नाही. आता कंगनाचा धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगनाचा धाकड हा सिनेमा आधी 27 मे रोजी प्रदर्शित होणार होता.