अविका गोरला बालिका वधू या मालिकेमधील अभिनयामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. अविकानं बालिका वधू या मालिकेमध्ये आनंदी ही भूमिका साकारली नुकतेच अविकानं तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटोमध्ये अविका ही लाल रंगाचा क्रॉप टॉप, ब्लू जेनिम आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. बालिका वधूमध्ये साध्याभोळ्या आनंदीची भूमिका साकारणाऱ्या अविकाच्या या ग्लॅमरस लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. वेगवेगळ्या लूकमधील फोटो अविका सोशल मीडियावर शेअर करते. अविका या फोटोला हटके कॅप्शन देखील देते. अविका आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विक्रम भट यांच्या चित्रपटामधून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.