अभिनेत्री कंगना रनौत ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



कंगनाच्या पोस्ट अनेकांचे लक्ष वेधत असतात.



नेपोटिझम, राजकारण यासारख्या विषयावर कंगना सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना तिची मतं लोकांसमोर मांडते.



नुकतेच कंगनानं एक ट्वीट पोस्ट केले आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.



कंगनानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'भिखारी फिल्म माफियानं माझ्या अॅटिट्यूडला 'अहंकार' असं म्हटलं. कारण मी दुसऱ्या मुलींसारखं हसणं, आयटम साँगवर डान्स करणं, लग्नात डान्स करणं, रात्री हिरोनं जर रुममध्ये बोलवलं तर जाणं यासारख्या गोष्टी करण्यास नकार दिला होता.'



'मला स्वत:साठी काहीही नको आहे, माझं सर्व गहाण ठेवून मी चित्रपट बनवला आहे, राक्षस निघून जातील आणि त्यासाठी मला कोणी ब्लेम करणार नाही.' असंही कंगनानं ट्वीटमध्ये लिहिलं.



2023 मध्ये कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या धाकड या चित्रपटानं फारशी कमाई केली नाही.



कंगनाच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.