बॉलिवूडची मुन्नी म्हणजेच, मलायका अरोरा अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. मलायका सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले क्लासी आणि बोल्ड फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या आगळ्यावेगळ्या आणि क्लासी फॅशन सेन्ससाठी मलायका ओळखली जाते. सध्या मलायकाचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. मलायकाच्या लेटेस्ट लूकबाबत बोलायचं झालं तर, मलायकानं व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे. व्हाईट ड्रेसमध्ये मलायका खूपच सुंदर दिसतेय. मलायकाने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट आयटम सॉन्ग बॉलिवूडला दिले आहेत. आपल्या क्लासी लूकसोबतच मलायका आपल्या फिटनेससाठीही ओळखली जाते. मलायकाची स्टाईल आणि तिचा लूक नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतो. (सर्व फोटो : @malaikaaroraofficial/Instagram)