सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकरी आदिपुरुष या चित्रपटावर टीका करत आहेत. या चित्रपटामधील हनुमानाचा डायलॉग आणि प्रभासचा लूक या गोष्टींना नेटकरी ट्रोल करत आहेत.
नुकतीच कंगना रनौतनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं अप्रत्यक्षरित्या 'आदिपुरुष'(Adipurush) या चित्रपटावर निशाणा सधला आहे का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे.
राम, सीता, हनुमान आणि लक्ष्मण यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कंगनानं त्या फोटोला 'देखो ऐ दीवानो, तुम ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो, बदनाम ना करो' या गाण्याचं बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आहे.
कंगनानं या पोस्टमध्ये आदिपुरुष चित्रपटाचा उल्लेख नाही केला, पण या पोस्टच्या माध्यमातून तिनं 'आदिपुरुष' चित्रपटावर निशाणा साधला आहे, असा अंदाज अनेक नेटकरी लावत आहेत.
कंगना (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2, इमर्जन्सी आणि तेजस या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची तिनं निर्मिती केली आहे.
कंगना ही तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
कंगना ही सोशल मीडियाच्या माध्यमतून तिची मतं मांडते.
कंगनाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.