बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा एअरपोर्टवर तिच्या ब्लॅक आऊटफिटमध्ये कॅमेरामध्ये कैद झाली. यावेळी परिणितीचा ब्लॅक सनग्लासेस देखील तिच्यावर उठून दिसत होते. परिणितीसोबत तिच्या काळ्या रंगांची बॅग देखील तिच्या आऊटफिटला शोभून दिसत होती. तिचे पांढऱ्या रंगांचे स्निकर्स तिच्या या लूकला अजून खुलवत होते. विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर परिणिती तिच्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये बसली. परिणितीच्या गोड हसण्याने तिने तिच्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली. परिणितीचे तिच्या या लूकमध्ये सुपर कूल आणि सुंदर दिसत होती. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. गेल्या महिन्यातच परिणिती आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा झाला होता. परिणिती ही सोशल मीडियावर देखील बऱ्याच प्रमाणात एक्टिव्ह असते.