इंडस्ट्रीतून कोणाला लॉक करायची इच्छा आहे? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कंगनाने करणचं नाव घेतलं. कंगनाने यावेळी करसोबतच अनेक स्टारची नावे घेतली आहेत. कंगनाने सांगितले की, सर्व प्रथम मी माझा बेस्ट फ्रेंड करण जोहरला लॉकअपमध्ये बंद करू इच्छिते. अमिर खानची मी खूप मोठी चाहती आहे, त्यामुळे अमिरला पण लॉकअपमध्ये बंद करायचे आहे. कंनना सांगते, मी मिस्टर बच्चन यांची देखील चाहती आहे. परंतु, ते स्पर्धकांच्या यादीत नाही तर माझ्या विश लिस्टमध्ये आहेत. कंगनाने यावेळी सांगितले की, लॉकअपमध्ये काही राजकीय नेते मंडळींनाही बंद केले पाहिजे. कंगणा एकता कपूरच्या बहुप्रतिक्षीत शोमध्ये डेब्यु करणार आहे. या शोचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. तुरुंगातील अडचणी या शोच्या ट्रेलरमध्येच समोर येत आहेत.