डॉ. अमोल कोल्हे 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. डॉ. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. डॉ. अमोल कोल्हेंनी आजवर अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे. डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर मतदार संघाचे खासदारदेखील आहेत. आज ते बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार' झाल्याचे पाहायला मिळाले. डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या फोटोत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. 'व्हाय आय किल्ड गांधी' या सिनेमात अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्याने ते चर्चेत आले होते. महात्मा गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका डॉ. अमोल कोल्हेंनी साकारल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.