रुबीना दिलैक 'बिग बॉस 14'ची विजेती आहे. रुबीना तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. रुबीना दिलैकने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत रुबीना बार्बी गर्ल दिसत आहे. रुबीना दिलैक लवकरच 'अर्ध' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रुबीनाचा बार्बी लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. बिग बॉस विनर रुबीनाचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. रुबीना मालिकेद्वारे घराघरांत पोहोचली आहे. सोशल मीडियावर रुबीना खूपच अॅक्टिव्ह असते.