काजोलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच तिच्या ब्लॅक साडीमधले फोटो शेअर केले आहेत. काजोलने तिच्या या फोटोसाठी हटके कॅप्शन पण दिले आहे. तिने तिच्या कॅप्शनमध्ये काळ्या रंगाचा अर्थ सांगितला आहे. त्यात म्हटलं आहे की, 'B फॉर बोल्ड आणि L फॉर लेजिली लव्हली' पुढे तिने म्हटलं आहे की, ' A फॉर ऑल इज वेल तिने C फॉर कॉफी असं पुढे म्हटलं आहे. शेवटी तिने K फॉर काजोल म्हणत ब्लॅक शब्दाचा अर्थ सांगितला आहे. या कॅप्शनमध्ये काजोलने ब्लॅक या शब्दाचा अर्थ सांगितला तर आहेच, पण तिने स्वत:विषयी देखील सांगितले आहे. काजोलने याआधी अनेकदा तिच्या ब्लॅक आऊटफिटमधले फोटो शेअर केले आहे. सध्या काजोल तिच्या नव्या वेब सिरिजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.