अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सध्या तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कंगनानं निर्मिती केली होती.
आता लवकरच तिचा 'चंद्रमुखी 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगनाने नुकतेच चंद्रमुखी 2 या चित्रपटचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.
कंगना रनौतने सोशल मीडियावर चंद्रमुखी 2 या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीच्या विशेष मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती कंगनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
कंगनाचा चंद्रमुखी 2 हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
कंगना ही चंद्रमुखी 2 या चित्रपटाबरोबरच इमर्जन्सी आणि तेजस या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.