अभिनेत्री असिन (Asin) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
असिननं पती राहुल शर्मासोबत घटस्फोट घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसलेल्या असिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून राहुलसोबतचे तिचे सर्व फोटो हटवल्याले आहेत, असं म्हटलं जात आहे.
त्यामुळे असिन आणि राहुल हे दोघे विभक्त झाले आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
सोशल मीडियावर असिन आणि राहुल यांच्या घटस्फोटोची चर्चा होत असतानाच आता असिननं एक पोस्ट शेअर करुन हे सर्व खोटं असल्याचं सांगितलं आहे.
असिननं पोस्टमध्ये लिहिलं, 'आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, आम्ही एकमेकांच्या जवळ बसून नाश्त्याचा आस्वाद घेत होतो आणि काही अत्यंत काल्पनिक आणि पूर्णपणे निराधार 'बातम्या' समोर आल्या आहे.'
असिननं पुढे पोस्टमध्ये लिहिले, 'या बातम्या बघून मला त्या दिवसांची आठवण आली जेव्हा, आम्ही आमच्या कुटुंबासह घरी बसून आमच्या लग्नाची बोलणी करत होतो आणि तेवढ्यात आमचं ब्रेकअप झालं आहे, अशी अफवा पसरली होती.'
अभिनेत्री असिनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे .
असिनने आमिर खानपासून सलमान खानपर्यंत अनेक बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
गजनी, रेडी या हिंदी चित्रपटामधील असिनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. असिननं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.