काजोल ही सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे नाही तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.



एका मुलाखतीमध्ये काजोलनं राजकीय नेत्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्याला अनेकांनी ट्रोल केलं.



एका मुलाखतीमध्ये काजोल म्हणाली होती, 'आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत ज्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी नाही.'



आता काजोलनं एका ट्वीटच्या माध्यमातून या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.



काजोलनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व याबद्दल एक मुद्दा मांडत होतो. माझा हेतू कोणत्याही राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा नव्हता, आपल्याकडे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर नेत आहेत.' काजोलनं हे ट्वीट करुन तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.



काही दिवसांपूर्वी काजोलचा 'सलाम वेंकी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं.



करण-अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’,‘गुप्त’, 'हलचल' या काजोलच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



काजोलचा लस्ट स्टोरीज-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.



काजोल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.



काजोलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.