अभिनेत्री अमिषा पटेल ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या गदर-2 या आगमी चित्रपटामुळे चर्चेत आहे.



नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमिषानं ओटीटीवरील कंटेन्टबाबत सांगितलं.



एका मुलाखतीमध्ये अमिषा ओटीटीवरील कंटेन्टबाबत म्हणाली, 'प्रेक्षकांना फक्त क्लिन फिल्म्स बघायला आवडतात. त्यांना असा चित्रपट बघायचा असतो, ज्याचा आनंद ते कुटुंबासोबत बसून घेऊ शकतात. '



'समलैंगिक विषयावर आधारित असणारा चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल बोलायचे तर ते ओटीटीवर खूप दाखवले जात आहेत. ओटीटीवर आता पूर्णपणे होमो, लेस्बियन यांच्यावर आधारित सीन्स दाखवले जातात, जे बघताना तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोळ्यांवर हात ठेवावा लागतो.' असंही अमिषानं सांगितलं.



'हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड', ‘भूलभुलैया’ आणि ‘रेस 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अमिषानं काम केलं आहे.



अमिषानं ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



अमिषाच्या 'गदर 2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



'गदर 2' या चित्रपटामध्ये अमिषा 'सकीना' ही भूमिका साकारताना दिसणार आहे.



अमिषा ही सोशल मीडियावर सक्रिय असते.



अमिषा ही विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.