प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून जोनास आडनाव काढून टाकले.
त्यामुळे प्रियांका आणि निकच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
अखेर प्रियांकाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
जोनास आडनाव का हटवले यावर प्रियांकाने मौन सोडले आहे.
प्रियांका म्हणाली, माझ्या ट्विटरच्या वापरकर्तानावाला माझे नाव जुळले पाहिजे. म्हणून मी असे नाव ठेवले आहे. लोकांसाठी ही एवढी मोठी समस्या का बनली आहे याचे मला आश्चर्य वाटते.
प्रियांकाने निक जोनाससोबत 2018 साली मोठ्या थाटामाटात लग्न केले होते.