शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या जयंत पाटलांची मैदानातही फटकेबाजी पाहायला मिळाली



शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने घाटकोपर येथे 'राष्ट्रवादी चषक' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.



मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या नगरसेविका राखी जाधव यांनी हे आयोजन केलंय.



या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.



यावेळी त्यांना देखील क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही.



बॅट घेऊन ते ही मैदानात उतरले आणि फटकेबाजी केली.



यावेळी त्यांनी म्हटलं आउट झालो तरी खेळण्याची संधी मला मिळाली.