मिलिंद गुणाजी यांचा मुलगा लग्नबंधनात

पाहा लग्न सोहळ्याचे खास फोटो

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मिलिंद आणि राणी गुणाजी यांचा मुलगा, अभिषेक गुणाजी हा नुकताच राधा पाटील हिच्या सोबत लग्न बंधनात अडकला.

राधा आणि अभिषेकची चर्चा त्यांच्या साखरपुड्याच्या बातमी नंतर भरपूर रंगली होती.

सोशल मीडियावर त्यांच्या जोडीचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.

या जोडप्याने त्यांचे लग्न मालवण येथे नयनरम्य वातावरणात करण्याचे ठरवले होते,

या ‘अनोख्या डेस्टिनेशन वेडिंग’ संकल्पनेचे राणी आणि मिलिंद यांनी भरपूर कौतुक केले.

अभिषेक हा आय.टी. अभियंता आहे, अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांच्या सोबत 'छल' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे.

या व्यतिरिक्त अभिषेक व्यावसायिक जाहिरातींसाठी देखील काम करत आहे.

अभिषेकची पत्नी राधा, ही देखील मुंबईत फार्मा क्षेत्रात काम करत आहे.